21.2 C
New York
Friday, September 22, 2023

Viral Video: स्ट्रीट फूडच्या नावाखाली सुरू आहे आरोग्याशी जीवघेणा खेळ, बघा समोर आला किळसवाणा व्हिडिओ

Viral Video: आपल्या देशात खाद्यसंस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. त्यात स्ट्रीट फूडच (Street Food) खवय्यांना वेगळं आकर्षण असतं. स्ट्रीट फूड आवडत नाही असे बोटावर मोजण्या इतकेच लोक सापडतील. तुम्ही देखील स्ट्रीट फूडचे चाहते (Street Food Video) असाल तर थोडं सावध व्हा! रस्त्यावरच अन्न स्वादिष्ट वाटत असलं तरी ते आरोग्यासाठी खूपच हानीकारक ठरतं.Also Read – Viral Video: तुम्ही म्हशीला डान्स करताना कधी पाहिलंय का?, हा व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकीत!

अशात स्ट्रीट फूड संदर्भात एका किळसवाणा व्हिडिओ (Street Food Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ बघून तुमचं संतप्त होणं स्वाभिविक आहे. Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

स्ट्रीट फूड खायला चविष्ट असले तरी हे पदार्थ बनवताना त्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या जातात, त्याचा दर्जा काय आहे. कोणतं तेल वापरलं जातं याबाबत अनेक शंका आहे. बहुतांश स्ट्रीट फूड विक्रेत्याकडून साधी स्वच्छता देखील पाळली जात नाही. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संकट अद्याप टळलं नाही. त्यामुळे लोकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी असे आवाहन सरकारकडून वारंवार केले जाते. तसेच संतुलित आणि सकस आहार घेण्याचा सल्ला देखील दिला जातो. मात्र, वारंवार आवाहन करुनही अनेकजण रस्त्यावरचे पदार्थ खात असतात. उघड्यावरचे अन्न आरोग्यासाठी हानीकारक असतं हे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. तरी देखील लोक आरोग्याच्या या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करतात. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

किळसवाणा व्हिडिओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by 🥰 puneet 🥰 (@puneet_kaur_gilll)

सोशल मीडियाच्या मध्यातून समोर आलेला एक व्हिडिओ अक्षरशः किळसवाणा असा आहे. लोकांच्या आयुष्याशी कसं खेळलं जात आहे हे या व्हिडिओतून लक्षात येते.

व्हिडिओत खाद्यपदार्थ विक्रीची गाडी आहे. या गाडीवर काहीतरी खाद्यपदार्थ विकले जातात. पण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेट चक्क रस्त्यावर खड्ड्यात साचलेल्या घाणेरड्या आणि दुषित पाण्यात धुतल्या जात असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतंय. विक्रेत्याकडून स्वच्छतेच्याबाबतीत किती हलगर्जीपणा केला जातोय, हे लक्षात येतं.

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याला आतापर्यंत एक लाख 38 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आणि शेअर देखील केला आहे. काहींनी हा व्हिडिओ पाहून तिव्र प्रतिक्रिया दिल्या आहे.
हा व्हिडिओ लक्षात घेता स्ट्रीट फूड आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तुम्ही देखील स्ट्रीट फूड खात असाल तर यापुढे नक्की काळजी घ्या.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles