21.7 C
New York
Saturday, June 3, 2023

Viral Video : अजब प्रेम की गजब कहानी! 62 वर्षांच्या आजोबांवर फिदा झाली 18 वर्षांची तरुणी

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडिओज व्हायरल (Video video) होत असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही तरी कथा असते. अशीच एक खास कहाणी सांगणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अनोखी लव्ह स्टोरी पाहायला मिळतेय. प्रेम करताना वय पाहिले जात नाही असे म्हटले जाते. अशीच एक प्रेमकथा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये एका 18 वर्षीय तरुणीचा जीव चक्क 62 वर्षांच्या आजोबांवर जडला आहे. मात्र यांच्या वयापेक्षा यांची लव्ह स्टोरी चकीत करणारी आहे. जी ऐकून तुम्हालाची आश्चर्य वाटेल. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावर विविध रिअ‍ॅक्शन देत आहेत.Also Read – Viral Video: तुम्ही म्हशीला डान्स करताना कधी पाहिलंय का?, हा व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकीत!

खास आहे लव्हस्टोरी

या व्हिडिओमध्ये 18 वर्षांची मुलगी आणि हे 62 वर्षीय व्यक्ती जवळ बसलेले दिसत आहेत. यावर काही लोक त्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावेळी या तरुणीला विचारण्यात आले की, तुला या वयस्कर व्यक्तीवर प्रेम कसे झाले? यावर ती म्हणतेय की, ‘ते ओढणी विकायचे. मला विविध ओढण्यांची खूप आवड होती. या ओढण्या रंगवण्यासाठीच मी यांच्या दुकानात जायचे. याच वेळी माझी त्यांच्यासोबत ओळख वाढत गेली. या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. आता मी त्यांच्या प्रेमात पडले आहे. नंतर ते मला ओढण्या गिफ्ट करत असतं. असंच आमच्या दोघांमधील प्रेम वाढले.’ असे ही तरुणी सांगताना दिसत आहे. Also Read – Mount Manaslu Avalanche: नेपाळच्या माऊंट मनास्लूमध्ये भीषण हिमस्खलन, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ होतोय व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Psycho Bihari (@psycho_biihari)

Also Read – Chandni Chowk Bridge Demolished Video : 600 किलो स्फोटके वापरून पाडला चांदणी चौकचा पूल, पाहा व्हिडिओ!

62 वर्षीय आजोबांचे पहिलेच लग्न

या व्हिडिओमध्ये 62 वर्षांचे आजोबा देखील त्यांच्या लव्हस्टोरीविषयी बोलताना दिसत आहेत. ते म्हणाले की, एवढे वय झाले माझे पण अजुन मला जोडीदार मिळाली नव्हती. माझे लग्न झाले नव्हते. आता या वयामध्ये मला जोडीदार मिळाली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर psycho_biihari नावाच्या पेजवरही हा व्हिडिओ अपलोड केला जात आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles