Viral Video : कोरोनामुळे (Corona Virus) तब्बल दोन वर्षांनंतर संपूर्ण देशभरामध्ये नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळीकडे मोठ्या उत्साहात गरबा आणि दांडिया खेळले जात आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने गरबा (Garba) आणि दांडियामध्ये (Dandia) सर्व जण सहभागी होत आहेत. गरबा आणि दांडियाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहेत. अशामध्ये एका व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधले आहे. चक्क एअरपोर्टवरच प्रवाशांनी गरब्याचा ठेका धरल्याचे या व्हिडिओमध्ये (Garba Video) दिसत आहे.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन
एअरपोर्टवरील गरब्याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एअरपोर्टवरील गरबा हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. बंगळुरू एअरपोर्टवरील (Bengaluru Airport) हा व्हिडिओ आहे. प्रवाशांनी चक्क मोठ्या संख्यने सहभागी होत गरब्यावर ठेका धरला आहे. अनेक जण या गरब्याचा व्हि़डिओ काढण्यात दंग असल्याचे दिसत आहे. गरबा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Also Read – Viral Video: तुम्ही म्हशीला डान्स करताना कधी पाहिलंय का?, हा व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकीत!
Just trust them when they say anything can happen in Bengaluru!
Had my @peakbengaluru moment again at @BLRAirport
Crazy event by staff! Beautiful to see random travellers gathering just to play Garba. pic.twitter.com/lpthAe933L— Divya Putrevu (@divyaaarr) September 29, 2022
Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
Aye! Adding a cutu video too. Such good sync ✨ pic.twitter.com/2D0jtF9qQR
— Divya Putrevu (@divyaaarr) September 29, 2022
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला आणि पुरुष प्रवासी गोल मोठं रिंगण तयार करुन गाण्यावर गरबा डान्स करत आहेत. महत्वाचे महजे काही महिला प्रवाशांनी तर सुंदर असा पारंपारिक पोषाख देखील परिधान केला आहे. अनेक महिला घागरा-चोलीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. हे दृश्य खूपच सुंदर आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.