15 C
New York
Tuesday, September 26, 2023

Viral Video: बॅगेत हालचाल जाणवल्याने घाबरली विद्यार्थींनी, चेन उघडता निघाली मोठी नागिन!

Viral Video: खरंतर पावसाळ्यात साप निघण्याचे प्रमाण वाढते. गावांसह शहरी भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात साप निघतात. मात्र जर चक्क शाळेच्या बॅगमध्ये साप निघाला तर काय होईल? मध्य प्रदेशातून अशीच एक घटना समोर आली आहे. एका दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत असेच काही घडले आहे.  एका शालेय विद्यार्थींनीच्या बॅगेतून (snake in school bag) चक्क मोठी नागिन निघाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर (Social Media) दररोज वेगवेगळे व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. यामधील हा व्हिडिओ भीती वाढवणारा आहे.Also Read – Viral Video: तुम्ही म्हशीला डान्स करताना कधी पाहिलंय का?, हा व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकीत!

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशातील ही घटना आहे. येथील शिवपुरी जिल्ह्यातील शाळेतील हा चकीत करणारा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीच्या बॅगमधून चक्क भला मोठा साप निघाला. ही विद्यार्थींनी रोज प्रमाणे बॅग घेऊन शाळेत जाण्यासाठी निघाली. ती पाठीवर बॅग घेऊन शाळेत देखील पोहोचली. मात्र तिने वर्गात बसून बॅग उघडली तेव्हा तिला बॅगेत काही तरी असल्या सारखे जाणवले. पाहिले तर बॅगेत नागिन होती. हे कळताच वर्गात एकच आरडा-ओरडा सुरु झाला. विद्यार्थी घाबरुन दूर पळू लागले. अशा वेळी एका शिक्षकाने हुशारी दाखवली आणि अत्यंत समजदारपणे ती बॅग वर्गाबाहेर घेऊन गेले. Also Read – Mount Manaslu Avalanche: नेपाळच्या माऊंट मनास्लूमध्ये भीषण हिमस्खलन, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

चेन उघडताच निघाली नागिन

तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, या शिक्षकाने सावधगिरीने बॅग हातात घेतली. त्यांनी ही बॅक वर्गाच्या बाहेर मोकळ्या जागेत ठेवली आहे. येथे त्यांनी हुशारीने बॅगची चेन उघडली आणि बॅगेतील थोडे साहित्य बाहेर काढले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, थोड्या वेळाने एक नागिन या बॅगेतून बाहेर पडली. जवळपास 4 ते 5 फूट लांबीची नागिन यामधून बाहेर पडत आहे. जानकारांच्या माहितीनुसार ही एक विषारी नागिन होती. Also Read – Chandni Chowk Bridge Demolished Video : 600 किलो स्फोटके वापरून पाडला चांदणी चौकचा पूल, पाहा व्हिडिओ!

बॅग उघडताच निघाली भली मोठी नागिन

कक्षा 10 की छात्रा कु. उमा रजक के बैग से, घर से स्कूल आकर जैसे ही बैग खोला तो छात्रा को कुछ आभाष हुआ तो शिक्षक से शिकायत की, कि बस्ते में अंदर कुछ है, छात्रा के बैग को स्कूल के बाहर ले जाकर खोला तो बैग के अंदर से एक नागिन बाहर निकली, यह घटना दतिया जिले के बड़ोनी स्कूल की है। pic.twitter.com/HWKB3nktza

— Karan Vashistha BJP 🇮🇳 (@Karan4BJP) September 22, 2022

पावसाळ्यात वाढतो साप निघण्याचा धोका

पावसाळ्यात साप निघण्याचा धोका वाढतो. अनेकदा आपल्याला गाडीमध्ये, बुटांमध्ये साप निघाल्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. साप हे अंधारात जाऊन बसतात. यामुळे वस्तूंचा वापर करताना एकदा नीट पाहून घेतल्या पाहिजेत. या घटनेत शिक्षकाने हुशारी दाखवली यामुळे दुर्घटना टळली आहे. अन्यथा विद्यार्थीनीच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असता.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles