Viral Video : लग्न (Wedding) म्हटलं की फोटोशूट (Photoshoot) आलेच. आज काल फोटोशूटची क्रेझ खूपच वाढली आहे. लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर नवनवीन ठिकाणी जाऊन फोटोशूट केले जाते. फोटोशूटसाठी एखादे गार्डन, समुद्र किनारा, निसर्गरम्य ठिकाणांची निवड केली जाते. पण बऱ्याचदा काही कपल्स फोटोशूटसाठी अशा ठिकाणांची निवड करतात की त्याची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. एका नवरीने फोटोशूटसाठी (Bride Photoshoot) चक्क खड्डेमय रस्त्यांची निवड केली आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून तिने खड्डेमय रस्त्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या नवरीचे हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे.Also Read – Viral Video: तुम्ही म्हशीला डान्स करताना कधी पाहिलंय का?, हा व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकीत!
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक नवरी आपल्या लग्नाचे फोटोशूट करत आहे. ती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. ती ज्या ठिकाणावरुन जात आहे त्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे दिसत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. ही नवरी वाहनचालकाप्रमाणे रस्त्यावरील खड्डे चुकवून पुढे चालताना दिसत आहे. याच वेळी एक फोटोग्राफर या नवरीचे फोटोशूट करत आहे. Also Read – Mount Manaslu Avalanche: नेपाळच्या माऊंट मनास्लूमध्ये भीषण हिमस्खलन, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
View this post on Instagram
Also Read – Chandni Chowk Bridge Demolished Video : 600 किलो स्फोटके वापरून पाडला चांदणी चौकचा पूल, पाहा व्हिडिओ!
या नवरीच्या फोटोशूटचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ arrow_weddingcompany या Instagram पेजवरून शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज आणि लाइक्स मिळत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 50 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 4 लाख 36 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
या फोटोशूटवर नेटिझन्स भरभरुन कमेंट्स करत आहेत. हे फोटो पाहून नेटिझन्स म्हणत आहेत की, ‘हे खूपच अनोखे फोटोशूट आहे.’ यूजर्स यावर सतत कमेंट्स करत आहेत. काही युजर्सनी लिहिले की, ‘प्रशासनाला झोपेतून जागे करण्याचा हाच योग्य मार्ग आहे!’ एका यूजरने गंमतीत लिहिले की, ‘काही वेळाने साडीचा रंग पिवळा होईल.’