15.9 C
New York
Friday, September 22, 2023

Heavy Rain Next Three Days : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालणार! IMD ने दिला मोठा इशारा

Weather Updates : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगर (Mumbai News) आणि संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. पुढील तीन दिवस पाऊस (Heavy Rain Next Three Days) थैमान घालणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे. (Rain) होईल, असा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे.Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

पाऊस परतीच्या मार्गावर आहे. अशातच देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मेघालय, आसाम. नगालंड, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर अंदमान निकोबार द्वीप समूहात देखील आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेन, असं हवामान विभागाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. Also Read – Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अडचणीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

पुढील तीन दिवस पाऊस थैमान घालणार…

भारतीय हवामान विभागानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात आज, गुरुवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. तसेच शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. Also Read – Maharashtra Rain Updates: राज्यात पुढचे चार दिवस पावसाचा अंदाज, आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात 'यलो अलर्ट'

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, ठाणे जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

28/09, Isolated patches of thunder clouds over Pune Satara, Raigad,South Madhya Maharashtra as seen frm the latest satellite obs at 3.30 pm.
Possibilities of light to mod rains over the areas with thunder. pic.twitter.com/VvpZzXDJkR

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 28, 2022

दरम्यान, राजस्थानात परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. तरी देखील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात देखील ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील काही भागात उष्णतेत वाढ झाली आहे. राज्यात 5 ऑक्टोबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता देखीव वर्तवली जात आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles