Weight Loss Drink: बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढीची समस्या (Weigh Gain) बहुतांश महिला- पुरुषांमध्ये निर्माण होत आहेत. महिला आणि पुरुष वाढते वजन आणि पुढे आलेल्या पोटामुळे चिंतेत आहे. कोरोनाच्या महामारीपासून ही समस्या अधिक वाढली आहे, कारण सुरुवातीला लॉकडाऊन आणि आता वर्क फ्रॉम होमची सवय लोकांना लागली आहे. यामुळे शारीरिक हालचाल प्रभावित होत वजन वाढीची समस्या निर्माण होत आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
वजन वाढीच्या प्रकरणात सर्वाधिक पोटाची चरबी वाढलेली (Belly Fat) असते. पोट आणि कंबरेची वाढलेली चरबी कमी करणे खूप कठीण (Belly Fat Tips) असते. तुम्ही देखील याचा समस्येने त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला एका विशिष्ट पेय बद्दल (Cumin Water For Weight Loss) माहिती देणार आहोत. हे पेय प्यायल्याने तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
पोटाची चरबी कमी करण्यास जिरे ठरते प्रभावी
पोटाची चरबी वाढल्याचा परिणाम आरोग्यावर आणि सौंदर्यावर देखील होतो. वाढलेले पोट कमी करणे वाटते तितके सोपे नाही. यासाठी अनेकजण महागडे उपचार तर काही जण व्यायामाचा मार्ग निवडतात. मात्र तरीही पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. मात्र आम्ही तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहोत. घरच्या घरी तुम्हाला हा उपाय करता येणार असून हा उपाय अगदी सोपा आहे. ऐकून आश्चर्य वाटले नं? मात्र हे खरं आहे. तुम्ही तुमच्या घरात असलेला जिरा मसाला वापरून या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी उपयुक्त ठरते. जिऱ्याचे पाणी शरीरातील चरबी कमी करते. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
असे तयार करा जिरं पेय
घरच्या घरी जिरे पेय बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी 2 चमचे जिरे एक ग्लास पाण्यात टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी उकळून घावे. उकडलेले हे पाणी थंड झाल्यावर सुती कापडाने गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस घालून हे पेय प्यावे. 2-3 आठवडे नियमित हा उपाय करा. जिरे पेय सहज तयार करण्यासाठी ते बारीक करून पावडर बनवून ठेवा. यासह जेवणानंतर एक चमचा जिरे पावडर एक कप पाण्यात उकळून प्यावे. असे केल्यास खूप फायदा होतो. तुम्हाला जिरे पेय आवडत नसेल तर तुम्ही जिरे कच्चे देखील चावू शकता.
(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)