World Heart Day 2022: हृदय विकाराने (Heart Disease) जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. सध्याच्या धावपळीच्या या युगात अनेकांना हृदय संबंधी व्याधी जडत आहे. पूर्वी वयोवृद्धांना जाणवणारी ही समस्या आता तरुणांना देखील भेडसावत आहे. लोकांना हृदयविकाराच्या (Heart Attack) समस्येची जाणीव करून त्यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी जागतिक हृदय महासंघाने ‘जागतिक हृदय दिन’ (World Heart Day) साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा कारण्याचा उद्देश म्हणजे हृदयविकारांपासून कसे वाचता येईल आणि कोणती लक्षणे दिसू लागल्यानंतर वैद्यकीय मदत घ्यावी या विषयी जनजागृती करणे आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
हृदय दिनाचा इतिहास
दरवर्षी जगभरात हृदयविकारामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. मृत्यूचा हा आकडा पाहता ही जागतिक चिंतेची बाब आहे. हृदयविकाराचे गांभीर्य लक्षात घेत जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड हार्ट फेडरेशनने एकत्रितपणे जागतिक हृदय दिन साजरा करत जनजागृती करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार 1997 ते 1999 या कालावधीत वर्ल्ड हार्ट फेडरेशनचे अध्यक्ष अँटोइन बेयस डी लुना यांनी यावर विचार केला आणि तेव्हापासून जागतिक हृदय दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. दरवर्षी 29 सप्टेंबरला दरवर्षी जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येतो. वर्ल्ड हार्ट फेडरेशनतर्फे या दिवशी जगभरात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजाराबद्दल जनजागृती करण्यात येते. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
काय आहे यंदाची थीम?
जागतिक हृदय दिन हा दरवर्षी एका थीमनुसार साजरा केला जातो. त्यानुसार यंदाची थीम ‘Use Heart for Every Heart’ म्हणजेच ‘प्रत्येक हृदयासाठी हृदय वापरा’ अशी आहे. या थीमवर जगभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम, आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
जागतिक हृदय दिनाचे महत्त्व
जगभरात दरवर्षी सुमारे 1.86 कोटी लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारामुळे होतो. हृदयविकाराबद्दल एक सामान्य गैरसमज असा आहे की हा आजार विकसित देशांतील लोकांना अधिक प्रभावित करतो. तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून आणि बैठी जीवनशैली जगतात अशा लोकांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. मात्र तसे नसून ही समस्यां कोणालाही होऊ शकते. या आजारामुळे 80 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू मध्यम-उत्पन्न आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. हृदयविकार होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अयोग्य आहार आणि चुकीची जीवनशैली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठीच दरवर्षी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. यात दरवर्षी 90 हून अधिक देश सहभागी होतात.